NCB Raid Titwala File Photo
ठाणे

NCB Raid Titwala: टिटवाळ्यात 5 कोटींचा एमडी साठा जप्त! महिला पुरवठादार अटकेत

या कारवाईने टिटवाळा संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा: गोरेगावच्या नेस्को सेंटरच्या ड्रग्ज पार्टीला कल्याण म्हणजेच ठाणे जिल्ह्यातून ड्रग्ज पुरवले गेल्याचे आणि आनंद पटेल नावाचा पेडलर कल्याणमधून अटक झाल्यानंतर कारवाईला वेग आला असून एनसीबीच्या पथकाने टिटवाळ्यात धडक कारवाई करत 35 वर्षीय महिलेला अटक केली आणि तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले.

या कारवाईने टिटवाळा संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी उशिरा रात्री टिटवळ्यातील पद्मावती सोसायटीत महिलेच्या राहत्या घरावर छापा टाकून करण्यात आली. या महिलेच्या ताब्यातून सुमारे 2 किलो 300 ग्रॅमपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. यात एमडीएमए तसेच ‌‘एमडी बटन‌’चे प्रमाण अधिक आहे.

या कारवाईचे धागेदोरे 15 एप्रिलच्या एका जप्तीशी जोडले गेले आहेत. त्यात एनसीबीने उघड केलेल्या एका वेगळ्या ड्रग्ज प्रकरणातून पुढे आले. त्या वेळी अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून या महिलेचा थेट सहभाग समोर आला.

कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, ही ड्रग्ज तस्कर महिला मूळची नवी मुंबईची रहिवासी आहे. ती गेल्या दीड महिन्यापासून टिटवळ्यात भाड्याच्या घरात वास्तव्यास होती.

या काळात ती स्थानिक पातळीवर ड्रग्ज वितरणासाठी सक्रिय असावी. तिचे संपूर्ण ड्रग्ज रॅकेट उघड करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या कारवाईमुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT