Badlapur News Pudhari
ठाणे

Kalyan Crime: कल्याण रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला

Kalyan railway station attack: कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानावर तीन जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांना दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये काही जण एका प्रवाशाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तातडीने डब्यात पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी तिघांना चौकशीसाठी फलाटावर उतरण्यास सांगितले. मात्र फलाट क्रमांक चारवर उतरताच आरोपींनी जवान नरेंद्र यादव यांच्यावर हल्ला चढवला. तिघांनी मिळून त्यांना मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अब्दुल शेख, सलमान शेख आणि सरकार शेख या तिघांना अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलीसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT