अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना संभाजी चौकातून दहाचाळमार्गे सुभाष टेकडी परिसरापर्यंत पायी नेले.  Pudhari
ठाणे

Ulhasnagar Crime | उल्हासनगर हत्येप्रकरणी पाच जणांना अटक; पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना संभाजी चौकातून दहाचाळमार्गे सुभाष टेकडी परिसरापर्यंत पायी नेले

पुढारी वृत्तसेवा

Five Arrested In Ulhasnagar

उल्हासनगर : शुक्रवारी मध्यरात्री रोहितवर जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर पेव्हर ब्लॉकने हल्ला तसेच चाकूने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी रोहितला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. त्यानंतर प्रथम बनकर, अतिश मनोहर, अनिकेत खरात ऊर्फ टॉम, साहिल म्हस्के आणि प्रतीक क्षेत्रे या पाच जणांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींची पोलिसांकडून धिंड

अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना संभाजी चौकातून दहाचाळमार्गे सुभाष टेकडी परिसरापर्यंत पायी नेले. आरोपींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रोहितच्या हत्येमागील जुन्या वादाचे नेमके कारण काय होते, तसेच या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास विठ्ठलवाडी पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT