Traffic Police  Pudhari
ठाणे

Traffic Police Transfer: वाहतूक विभागात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; १२ पोलीस निरीक्षकांना नव्या ठिकाणी जबाबदारी

पोलिस निरीक्षक संजय महादेव जाधव यांची कळवा वाहतूक उपविभागातून राबोडी वाहतूक उपविभागात तैनाती करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात प्रशासकीय कारणास्तव पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या तैनातीत फेरबदल करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केले आहेत.

पोलिस निरीक्षक संजय महादेव जाधव यांची कळवा वाहतूक उपविभागातून राबोडी वाहतूक उपविभागात तैनाती करण्यात आली आहे.

विजयकुमार काकासाहेब देशमुख यांना वाहतूक नियंत्रण कक्षातून वागळे वाहतूक उपविभागात, मिलिंद लालासाहेब झोडगे यांना कल्याण वाहतूक उपविभागातून कोळसेवाडी वाहतूक उपविभागात, राजू भिकाजी पाचोरकर यांना वाहतूक नियंत्रण कक्षातून कोपरी वाहतूक उपविभागात नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच जयपालसिंग नथेसिंह राजपूत यांची कळवा, कृष्णदेव कल्पना खराडे यांची कोनगाव, उमेश पुरुषोत्तम सावंत यांची कल्याण, राबोडी वाहतूक उपविभागातून युवराज प्रकाश सरनोबत यांची उल्हासनगर, ज्ञानेश्वर महादेव धनवे यांची प्रशासन येथून विठ्ठलवाडी, वाहतूक नियंत्रण कक्षातून विजय बन्सीलाल अहिरे यांची डोंबिवली, अंकुश रामचंद्र म्हस्के यांची अंबरनाथ वाहतूक उपविभागात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. तर रणजित पंडित नलवडे यांची वाहतूक नियंत्रण कक्षातून प्रशासन शाखेत तैनाती करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT