Crime News pudhari photo
ठाणे

Thane Crime : मंगरूळूरू एक्सप्रेसमधून मद्य तस्करीचा पर्दाफाश

ठाणे स्थानकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : परराज्यातील गोवा निर्मित विदेशी मद्याची रेल्वेतून होणारी तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे. मंगरूळूरू एक्सप्रेसमधून दोन बॅगांमध्ये भरून आणलेला मद्यसाठा ठाणे रेल्वे स्थानकावर उतरविताना पथकाने एका संशयिताला पकडले. शिवम छनबस मठपती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून विविध नामांकित ब्रँड्सच्या ६१ सीलबंद मद्याच्या बाटल्या आणि दोन बॅगा असा एकूण ७१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुधवारी (२३ सप्टेंबर) दारूबंदी गुन्ह्यांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक ठाणे रेल्वे स्थानक परिसरारात गस्त घाालत होते. यावेळी निरीक्षक आनंद अं. पवार यांच्या पथकाला मंगरूळूरू एक्सप्रेसमधून गोवा निर्मित मद्याची तस्करी केली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक ८ वर मंगरूळूरू एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३४) दाखल होताच पथकाने नजर ठेवली.

या वेळी दोन बॅगांसह एक इसम संशयास्पदस्पदरीत्या उतरताना दिसला. पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपले नाव शिवम छनबस मठपती असल्याचे सांगितले. तसेच आपण रेल्वेत परिचारक (अॅटेंडन्ट) म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले.

पथकाने त्याच्याकडील दोन्ही बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा निर्मित विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. ही कारवाई निरीक्षक आनंद अं. पवार, दुय्यम निरीक्षक पी. एम. खरबे, सहायक दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकते, जवान एस. एस. पैठणकर आणि आर. एस. गोलतकर यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक पी. एम. खरबे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT