Thane Crime News Pudhari
ठाणे

Thane Crime News: ठाण्यातून वेश्याव्यवसाय दलाल अटकेत; दोन तरुणींची सुटका

या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ऑर्केस्ट्रा बार मध्ये काम करणाऱ्या तरुणींचे फोटो ग्राहकांना व्हॉटसअपवर पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिला एजंटला ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या एजंटच्या तावडीतून दोन पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासारवडवली, आनंदनगर येथे एक महिला एजंट दोन तरुणींना शरीरविक्रयासाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकास मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने काही पंचासह शुक्रवारी रात्री सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी एक महिला एजंटला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली. अटकेतली महिला एजंट ऑर्केस्ट्रा बार मध्ये काम करणाऱ्या तरुणींच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलून त्यांना हे काम करण्यास भाग पाडत होती.

व्हाट्सएपवर ग्राहकांना ही महिला फोटो पाठवून नंतर पैसा व ठिकाण याची डील चॅटिंगच्या माध्यमातून करीत होती. सुटका करण्यात आलेल्या दोघी तरुणी देखील पैशाच्या अमिषापोटी तिच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT