Vote Pudhari
ठाणे

TDC Bank election: ठाणे जिल्हा बँकेची 27 जून रोजी निवडणूक; 21 संचालकांसाठी होणार मतदान

3 टर्म सलग संचालक असलेल्यांना संधी नाही

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 27 जून रोजी मतदान होणार आहे. 28 जून रोजी मतमोजणी होऊन बँकेची तिजोरी कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होईल.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालकांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. टीडीसी बँकेचे 4 हजार 27 मतदार असून ते शेती संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था,धान्य अधिकोष सहकारी संस्था, प्रत्येक तालुक्यात एक प्रतिनिधी असे एकूण 14 संचालक, पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था एक संचालक, खरेदी विक्री संस्था, मच्छिमार सहकारी संस्था, जंगल कामगार सहकारी संस्था , दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मिळून एक संचालक, महिला प्रतिनिधी 2, एस. सी. /एसटी एक संचालक, एनटी/ व्हीजीएनटी एक संचालक, ओबीसी एक संचालक, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यक्तिगत भागधारक लोकल ऍथॉरिटी ऍड पब्लिक ट्रस्ट असा एक संचालक असे मिळून 21 संचालक निवडले जातात.

बँकेची निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. 2 जून रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार असून 3 जून ते 17 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.

18 जुनला निशाणी मिळाल्यानंतर 27 जूनला मतदान होणार आहे. सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालकपद भूषविणाऱ्या संचालकांना अपात्र ठरविण्यात आल्याने नवीन संचालकांना संधी मिळणार आहे.

त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी आमदार अमित घोडा, नागेश पाटील, निवृत्ती घुसेकर, दासू रेडया, नीता कांबळी या जुन्या संचालकांना निवडणुकीत पुन्हा संधी मिळते की पूर्ण पणे नवीन चेहऱ्यांना सभासद बँकेची तिजोरी हाती सोपवितात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2021 निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला 9, भाजपा 7 व अन्य 2 असे सहकार पॅनलचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले होते.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बदलेल्या राजकीय वातावरणामुळे भाजपचे वर्चस्व वाढलेले दिसत असले तरी नवीन अध्यक्ष कुठल्या विचारधारेचा असेल हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल असे सद्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT