Thane District Bank Election Pudhari
ठाणे

Thane District Bank Election: जिल्हा बँकेत सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल; निलेश सांबरेंच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस

माजी खासदार-आमदार भिडणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्षीय सहकार पॅनल विरुद्ध भाजपप्रणित परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत होणार असून शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने विक्रमगड तालुका आणि ओबीसी मतदार संघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.

गृहनिर्माण संस्था मतदार संघातून ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे हे रिंगणात असल्याने प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर अनुसुचित जाती मतदारसंघात माजी खासदार बळीराम जाधव आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा हे एकमेकांविरोधात भिडणार आहेत.

ठाणे जिल्हा बँकेची २७ जून रोजी निवडणूक होणार असून २१ पैकी १० उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

सर्व पक्षीय पॅनल असलेल्या सहकार पॅनल आणि भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलमधून सेनेचे उपनेते निलेश सांबरे यांना डावलण्यात आले आहे. त्यांची समजूत काढण्यात शिवसेना नेते मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार किसन कथोरे आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे अपयशी ठरले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम करणारे निलेश सांबरे यांच्या उमेदवारीमुळे प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदार संघ विक्रमगडमध्ये संदीप पावडे, सुनील पाटील आणि निलश सांबरे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदार संघात दोन्ही पॅनलचे अधिकृत उमेदवार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT