Kalyan Crime News: पत्नीच्या नावावर जागा घेतल्याचा वाद; पतीकडून पत्नीची हत्या

पतीला पोलिसांनी केली अटक
Kalyan Crime News
Kalyan Crime Newsfile photo
Published on
Updated on

कल्याण: गावी पत्नीच्या नावावर जागा घेतल्याच्या कारणावरून सुरू असलेल्या वादाचा शेवट धक्कादायक घटनेत झाला आहे. कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रोड परिसरात पतीने पत्नीला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव आयशा बानो असे आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पती मुबीन खान याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

शंभर फुटी रोड परिसरात राहणाऱ्या मुबीन खान आणि त्याची पत्नी आयशा बानो यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. मुबीन खान याने मध्यप्रदेशातील गावी एक जागा पत्नी आयशाबानोच्या नावावर घेतली होती. पत्नीच्या नावावर जागा का घेतली? असा सवाल त्याचे नातेवाईक करत होते. याच कारणावरून आयशा बानो आणि मुबीन यांच्यात वाद होत होते.

Kalyan Crime News
Hawker Committee: मुहुर्त भेटला! वर्षभर रखडली फेरीवाला समितीची पहिली बैठक आटोपली

१० मे रोजी झालेल्या वादाच्या वेळी मुबीन खान याने पत्नीच्या पोटात ठोसे आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आयशाबानो यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते.

Kalyan Crime News
Hawker Committee: मुहुर्त भेटला! वर्षभर रखडली फेरीवाला समितीची पहिली बैठक आटोपली

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आयशा बानो यांच्या भावाच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी मुबीन खान याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत. २००६ मध्ये दोघांचे लग्न झाले होते दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news