ACB Bribery Statistics Pudhari
ठाणे

ACB Bribery Statistics: ठाणे-पालघरमध्ये सात वर्षांत 84 लाचखोर जाळ्यात; पोलीस व जिल्हा परिषद विभाग आघाडीवर

2019 ते 2025 दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; 16 खासगी खाबूंवरही गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील लाचखोरी, भ्रष्टाचाराच्या घटनांचा वाढता आकडा चिंतेचा विषय बनत चालला आहे. 2019 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत ठाणे, पालघर विभागातील विविध शासकीय आस्थापनांतील शेकडो लाचखोर अधिकारी, कर्मचारी व खासगी खाबू ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. यामध्ये लाच घेण्यात पोलीस व जिल्हा परिषद विभाग आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

ही आकडेवारी ठाणे लाचलुचपत विभागातील आहे.

लाच घेणे आणि देणे हा कायद्याने गुन्हा असला आणि शासनाने, समाजसेवकांनी कितीही जनजागृती केली तरी प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या कामांसाठी सर्रास लाच दिली आणि घेतली जात आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. ठिकठिकाणच्या शासकीय कार्यालयात,अस्थापनांत लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून याबाबत जागरूक रहा व तत्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधा, असे पोस्टर लागलेले असून शासकीय निमशासकीय तसेच इतर अस्थापनांवर रुजू असलेले हे सर्व पगारदारी लोकसेवक आहेत. त्यांच्याकडून जर लाच मागितली जात असेल तर आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी लागलीच संपर्कात या. असे हे पोस्टर आहेत. मात्र याचा सरकारी बाबूंच्या मनावर जनजागृतीचा कोणताही परिणाम होत नाही. प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण असून राज्यभरात लाच घेताना दररोज एखादा तरी कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत आहे.

जर लोकसेवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तुमचे शासकीय काम प्रलंबित ठेवून ते करण्यास स्वतः अथवा कोणाचे हस्ते लाच किंवा त्याच्या मोबदल्याची मागणी करीत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंद करावी. तसेच प्रामाणिक लोकसेवक यांना बेकायदा काम करून घेण्याच्या उद्देशाने जर कोणी लाच देऊ करीत असेल तर त्यांनी देखील तक्रार नोंदणी केली पाहिजे, असे पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांनी सांगितले.

कुठल्या विभागात किती कारवाई

मागील सात वर्षांत ठाणे पालघरच्या विविध शासकीय आस्थापनेतील शंभराहून अधिक लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे. यामध्ये सन 2019 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत शिक्षण विभाग - 6, महसूल विभाग- 6, वनविभाग 7, पोलीस प्रशासन 9, आरोग्य विभाग 2, दुय्यम निबंधक वर्ग क- 1, कृषी विभाग 1 जिल्हा परिषद - 9 महावितरण-7, महिला बाल कल्याण विकास 1, खासगी 4, विधि व न्याय विभाग- 2, विक्रीकर - 1, आदिवासी विभाग - 1, महापालिका 2, जातपडताळणी - 2, एमएमआरडीए 1, कामगार 1 यांचा समावेश आहे.

तर 2024 मध्ये 11 व 2025 मध्ये 10 खाबू बाबूंवर कारवाई केली गेली असून शासकीय लोकसेवक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना रसमलाई ग्रहण करणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून बाबू जाळ्यात सापडले आहेत. याचबरोबर 16 खाजगी खाबूगिरीकार जाळ्यात अडकवले आहेत.

वर्ष किती जणांवर कारवाई

सन 2019 : 12

सन 2020: 6

सन 2021: 14

सन 2022: 16

सन 2023 : 15

सन 2024: 11

सन 2025: 10

एकूण 84 यामध्ये 16 खासगी खाबू वेगळे आहेत.

कोणत्या विभागाचे किती?

वनविभाग -2

महसूल- 2

महावितरण-2

ग्रामविकास विभाग 2

पोलीस विभाग 1

आरोग्य विभाग 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT