ठाण्यात क्रिकेटचे ऑनलाईन बेटिंग चालविणाऱ्या दोघांना अटक pudhari photo
ठाणे

Thane online cricket betting : ठाण्यात क्रिकेटचे ऑनलाईन बेटिंग चालविणाऱ्या दोघांना अटक

घटनास्थळावरून मोबाईल, टॅब व इतर साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सध्या सुरु असलेल्या दिल्ली कॅपिटल आणि गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याच्या ऑनलाइन क्रिकेट बेटिंगच्या धंद्याचा पर्दाफाश वागळे इस्टेट पोलिसांनी केला. ठाणे शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापेमारी करीत आनंद वासुदेव दियालानी (वय 37) व भारत कृष्णा सोनावणे (वय 41) या दोघांना अटक करून घटनास्थळावरून मोबाईल, टॅब व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या तीन हातनाका परिसरात ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे कक्षाला मिळाली होती. त्यानुसार त्या कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने 8 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास इंटरनेटी मॉल, तीनहात नाका येथील ‌‘द प्रॉपर्टी स्टोअर‌’ या कार्यालयावर छापा टाकला.

तेथे आनंद वासुदेव दियालानी (वय 37) व भारत कृष्णा सोनावणे (वय 41) हे ऑनलाइन साईटद्वारे क्रिकेट बेटिंग करत असल्याचे आढळून आले. दिल्ली कॅपिटल्स व गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यावर बेटिंग सुरू होते. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये विविध बेटिंग वेबसाइट्स व सक्रिय युजर आयडी आढळले.

सुमारे 14.99 लाख रुपयांची व्यवहाराची नोंदही सापडली. तसेच व्हॉट्सॲप चॅटद्वारे बेटिंग आयडी पुरवठ्याचे पुरावे मिळाले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत, त्यांच्याविरोधात पोलिस अंमलदार महेश सावंत यांच्या तक्रारीनुसार भारतीय न्यायसंहिता कलम 318(2),महाराष्ट्र जुहार कायदा कलम 4,5 व ऑनलाइन गेमिंग प्रचार आणि नियमन कायदा 2025 चे कलम 5,9,(1) अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT