ठाणे : घोडबंदर येथील माजिवडा उड्डाणपुलावर मंगळवारी (दि.२३) रोजी क्रेन बंद पडल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. pudhari news network
ठाणे

Thane News | घोडबंदर रोडची वाहतूककोंडी काही केल्या फुटेना

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणार्‍या वाहनचालकांना घोडबंदर येथील माजिवडा उड्डाणपुलावर क्रेन बंद पडल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. मंगळवारी (दि.२३) रोजी ऐन सकाळीच हा गोंधळ उडाल्याने कामावर जाणार्‍या नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. काही वेळानंतर ही क्रेन हटवण्यात आली. मात्र सर्व वाहने आतल्या बाजूने प्रवास करत असल्याने यामुळे अंतर्गत भागातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

घोडबंदर रोडवर दररोज अपघात, खड्डे, मेट्रोचे बॅरिकेड्स आणि वाहन बंद पडण्याच्या घटनांनी नोकरदारांचा खोळंबा नित्याचा झाला आहे. मंगळवारी (दि.२३) रोजी सकाळी देखील माजिवडा उड्डाणपुलावर घोडबंदर रोड येथून ठाण्याच्या दिशेने येणार्‍या मार्गिकेवर क्रेन बंद पडली. या नादुरुस्त वाहनामुळे मुंबई - ठाण्याच्या दिशेने येणार्‍या वाहनांना ब्रेक लागला. वाहनांची रांग मानपाडा उड्डाणपुलापर्यंत आल्याने वाहन चालकांनी पुढे जाण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला. त्यामुळे ब्रह्मांड, कोलशेत, ढोकाळी, मनोरमानगर, बाळकूम भागातही कोंडी झाली. या कोंडीचा फटका सकाळी कामावर जाणार्‍या नोकरदारांना आणि शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या वाहनांना बसला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT