घोडबंदरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मेट्रोच्या कामामुळे दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
traffic jam
घोडबंदरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीfile photo

ठाणे : घोडबंदरच्या दोन्ही मार्गावर गुरूवारी सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर वरून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडून घोडबंदरकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जे लोक स्वतःचे वाहन घेऊन निघाले होते ते तब्बल दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकले, तर सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहनच उपलब्ध न झाल्याने रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. या वाहतूक कोंडीचा फायदा घेत रिक्षा चालकांनी प्रवाशांची अक्षरशः लूट केली. घोडबंदर पासून ठाणे स्टेशनला जाणाऱ्या शेअर ऑटोसाठी प्रत्येक सीट मागे जिथे पन्नास रुपये आकारले जातात त्याच ठिकाणी रिक्षा चालकानी दुप्पट भाडे आकारत प्रवाशांकडून शंभर रुपये वसूल केले. यासंदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री उशिरापर्यंत ओवळा आणि आर मॉल या ठिकाणी मेट्रोचे गार्डन बसवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती दिली. वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news