ठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेना -भाजपची युती झाली असून महाविकास आघाडीतून काँग्रेसने बाहेर पडून स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेला (मित्र पक्षांसह) ९१ जागा तर भाजपला ४० जागा सोडण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दैनिक पुढारीने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. दुसरीकडे शिवसेनेने धक्का तंत्राचा वापर करीत दिग्गज नगरसेवकांना उमेदवारी नाकारली असताना मुंब्रातील माजी नगरसेवक राजन किणी यांच्यासह चौघांनी शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले आहे.
शिवसेनेचे ठाणे आणि भाजपची मुंबई हे नवीन समीकरण तयार करण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असतानाही शिवसेना आणि भाजपची ठाण्यात युती झाली. जागा वाटपावरून दोघांमध्ये रस्सीखेच सुरु असताना भाजपला ४० जागा सोडल्या जाणार आणि शिवसेनेला ९१ जागा मिळणार असे वृत्त दिनांक २५ डिसेंबररोजी दैनिक पुढारीत प्रसिद्ध केले होते. या वृत्तानुसार जागा वाटप जाहीर झाले आहे. आमदारांची नाराजी, कार्यकर्त्यांचा दबाब असूनही एकही जागा वाढवून देण्यास शिवसेनेने नकार दिल्याने भाजपकडे येणारा माजी नगरसेवकांचा लोंढा रोखला गेला. शिवसनेच्या ९१ जागांपैकी ८७ जागा ह्या शिवसेने लढविणार होत्या तर चार जागा मित्र पक्षांना सोडण्यात येणार आहेत. मात्र मुंब्यातील जेष्ठ नगरसेवक राजन किणी यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतली आहे. आमदार
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात किणी यांनी आघाडी उघडली. त्यांना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आर्थिक बळ देऊन आव्हाड यांना नामोहरण केले होते. मात्र आमदार आव्हाड यांनी विक्रमी विजय मिळवत शिवसेनेला धोबीपछाड दिली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत किणी आणि त्यांच्यासोबतच्या सहासात माजी नगरसेवकांची अडचण निर्माण झाली होती. त्यांनी मुंब्रा विकास आघाडी तयार केली. अपयश येण्याची शक्यता लक्षात घेऊन
शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली. शिवसेनेने वार्ड ३१ मधील चार जागा किणी यांना सोडल्या. उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले असताना किणी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करून शिवसेनेला धक्का दिला आहे. एवढेच नाही तर त्यांच्या सोबत गेलेल्या काही माजी नगरसेवकांची गोची झाली आहे. याच मुंब्यातून आता आनंद आंबेडकर यांच्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. भाजपच्या ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. घोडबंदर रोड आणि वागळे इस्टेटमध्ये दिग्गज माजी नगरसेवकांना तिकीट कापून आयात उमेदवारांना संधी दिल्याने रात्रभर भाजप कार्यालयात नाराज कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. पोलिसांना पाचारण करावे लागले. काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या उमेदवारांची संख्या ९० झाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी स्वतः सह १०१ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.
खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के यांना शिवसेनेच्या एका माजी आमदारांच्या हट्टापोटी उमेदवारी नाकारण्यात आली. दुसरीकडे शाखा प्रमुखाला निलंबित केले म्हणून जिल्हा संघटन पदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडून देणाऱ्या माजी महापौर