अटक  
ठाणे

Thane News | भिवंडीत 20 लाखांचा चरस बाळगणारी महिला गजाआड

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहरात 20 लाखांचा दोन किलो चरस बाळगणार्‍या महिलेस गजाआड करण्यात आले आहे. या महिलेकडून 2 किलो 2 ग्रॅम वजनाचा 20 लाख 75 हजार रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आला आहे.

अनेक भागात सर्रासपणे चरस गांजा विक्री केला जात असून अशा व्यवसायातील व्यक्तीं विरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांनी दिले असता भिवंडीत पोलीस कारवाईत या महिलेस गजाआड करण्यात आले आहे. शबाना कुरेशी (वय 39, रा. कसाईवाडा, निजामपुरा) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला ही चरस विक्री करण्यासाठी अशोक नगर रस्त्यावरील पोस्ट कार्यालयासमोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने रात्री 11 वाजताच्या सुमारास सापळा रचून या महिलेस ताब्यात घेतले. झडतीत चरस आढळून आल्याने तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT