Thane News | डहाणूत भाजीपाल्याच्या प्लास्टिक के्रटआडून गांजा तस्करी

डहाणूमध्ये 12 लाखांचा गांजा मुद्देमाल हस्तगत; जव्हार पोलिसांची धडक कारवाई
pudhari
भाजीपाला क्रेटआडून वाहतूक रोखत डहाणू शिवनेरी ढाबा येथे सुमारे 12 लाख रुपयांचा अमली पदार्थ, गांजा हस्तगत करण्यात आला. pudhari news network

जव्हार : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भाजीपाल्याच्या क्रेटच्या आडून बनावटीच्या दारू तस्करीनंतर आता जव्हार पोलिसांनी भाजीपाला क्रेटआडून वाहतूक रोखत डहाणू शिवनेरी ढाबा येथे सुमारे 12 लाख रुपयांचा अमली पदार्थ, गांजा हस्तगत केला. संपूर्ण पालघर जिल्हाभरातून पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे.

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागांत नियमितपणे नाकाबंदी करण्यात येत आहे, दरम्यान शिवनेरी ढाबा, डहाणू नाका येथे एमपी 46जी 2249 या क्रमांकाची पीक अप गाडी निदर्शनास आली. यात भाजीपाल्याचे प्लास्टिक क्रेट आढळले. उपस्थित पोलीस टीमला संशय आल्याने गाडीची तपासणी केली असता,सहा प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये 31 किलो 868 ग्रॅम अमली पदार्थ गांजा असा एकूण 7 लाख 97 हजार 450 रुपये, महिंद्रा पीक अप वाहन मूल्य 3 लाख 50 हजार आणि प्लास्टिक क्रेट 60 मूल्य रुपये 3 हजार असे सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनील तुकाराम आर्य (24 वर्ष), श्रीराम दिनेश सोलंकी (वय 21) वर्ष हे दोघेही मध्यप्रदेश येथील रहिवासी असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क) , 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जव्हार पोलीस ठाणे प्रभारी संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news