ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळली Pudhari news network
ठाणे

Thane News : रेमंड इमारतीमधील लिफ्ट प्रकरणात गुन्हा दाखल

Raymond building case : लिफ्ट दुरुस्त न केल्याने तांत्रिक बिघाड

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : वर्तकनगर येथील रेमंड इमारतीमध्ये सोमवारी (दि.21) लिफ्ट कोसळल्याची घटना घडल्यानंतर मंगळवारी (दि.22) या प्रकरणात रेमंड फॅसीलीटी मॅनेजमेंट व सोसायटीचे मेंटनन्स काढणार्‍या सदस्यांच्या विरोधात वर्तक नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिफ्ट कोसळल्याची घटना प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेले नसले तरी, या घटनेत नेमका कोणाचा हलगर्जीपणा आहे, या दिशेने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

ठाण्यातील वर्तनगर परिसरात असलेल्या रेमंड गृहसंकुलात असलेल्या विस्टा इमारतीची लिफ्ट सोमवारी सायंकाळी कोसळली. या दुर्घटनेत चौघेजण थोडक्यात बचावले होते. लिफ्टमध्ये तीन जण तर एक लहान मुलगा अडकला होता. चारही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. तर मुलाला अत्यंत किरकोळ दुखापत झाली होती .या प्रकरणात आता रेमंड फॅसीलीटी मॅनेजमेंट व सोसायटीचे मेंटनन्स काढणार्‍या सदस्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला असून पोलिसांनीही तपास सुरु केला आहे. दरम्यान, लिफ्ट बिघाड होत असल्याबाबत अनेक तक्रारी वेळोवेळी सोसायटीचे मेंटनन्स बघणारे रेमंड फॅसीलीटी मॅनेजमेंट यांना करून सुध्दा त्यांनी रहिवाशी लिफ्टच्या बाबत कोणतीही दक्षता घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच लिफ्ट दुरूस्त न केल्यामुळे थेट तळमजल्यावर कोसळली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT