ठाणे ः ठाणे पालिका हद्दीतील घोडबंदर रोडवरील भयावह परिस्थिती आणि गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातात 18 मृत्यू झाल्याची माहिती न्यायालयाला याचिकाकार्त्याने देत ठाण्यात वर्षभरात खड्यांमुळे झालेल्या रस्ते अपघातात एकही मृत झालेला नसल्याच्या पालिकेच्या दाव्याचा पडदाफार्स केला. काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची कात्रनेच न्यायालयात सादर केली.याची खंडपिठाने गंभीर दखल घेतली.
ठाण्याला उत्तर मुंबई, वसई-विरार, भिवंडी आणि गुजरातशी जोडणारा घोडबंदर रोड हा व्यापार आणि व्यवसायाच्याय दृष्टीनं अतिशय महत्त्तवाचा दुवाय आहे.असे असताना गायमुख घाटतील अरूंद रस्त्यामुळे इथे गेली अनेक वर्ष वाहतूक समस्या कायम आहे. ती दिवसेंदिवस भयावह होत चाललीय. असे असताना प्रशासनत्याकडे गांभीर्यानं का पाहत नाही?, असा सवाल मंगळवारी हायकोर्टानं उपस्थित करत ठाणे पालिकेची झाडा झाडाती घेतली.
परीस्थिती सुधारण्यासाठी पुढील मान्सूनची वाट पाहू नका अशी तंबी देत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं ठाणे महापालिका आणि राज्य सरकारला 15 डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत.