ठाणे महापालिका निवडणुकीसाठी निघणार आरक्षण सोडत file photo
ठाणे

Thane municipal election : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी निघणार आरक्षण सोडत

राम गणेश गडकरी रंगायतमध्ये सकाळी सुरु होणार सोडत कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आज आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे आज ठाणे महापालिका क्षेत्रातील आरक्षण निश्चित होणार असून निवडणुकीचे चित्र देखील स्पष्ट होणार आहे.

ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून आरक्षण सोडत काढण्या सुरुवात होणार आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी, 32 प्रभाग हे चार सदस्यीय असून 01 प्रभाग तीन सदस्यीय आहे. या 33 प्रभागातून ठाणे महानगरपालिकेत एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहेत.या 131 पैकी, अनुसूचित जातींसाठी 09 जागा, अनुसूचित जमातींसाठी 03 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत.

एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी, अनुसूचित जातींच्या 05 जागा, अनुसूचित जमातींच्या 02 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 18 जागा आणि सर्वसाधारण प्रर्वगातील 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत.नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव करावयाच्या सर्व प्रवर्गांतील जागांसाठी सोडतीच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांकडून काढण्यात येतील.त्यात प्रथम अनुसूचित जातीच्या महिलांसाठी 05 जागांची सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या 2 प्रभागांच्या जागांसाठी सोडत काढली जाणार आहे.

नागरिकांच्या मागास प्रर्वगाच्या प्रभागांसाठी 35 जागा आरक्षित करायच्या असून त्यासाठी सोडत निघणार आहे. त्यानंतर, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांच्या 18 जागांसाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करावयच्या 41 जागांसाठी सोडत होणार आहे.

हरकत व सूचनांचा कालावधी...

17 नोव्हेंबर, रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर, 17 नोव्हेंबर 24 नोव्हेंबर,( दुपारी 3.00वाजेपर्यंत ) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असणार आहे.हरकती व सूचना महानगरपालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र अथवा सर्व संबंधित नऊ प्रभाग समिती कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT