ठाणे महानगरपालिका pudhari photo
ठाणे

Thane Municipal Corporation : 5 मार्चला लागणार स्वीकृत नगरसेवकपदाची लॉटरी

ठाणे महापालिकेच्या स्वीकृतसाठी इच्छुकांची पक्षश्रेठींकडे फिल्डिंग

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी अशा लावून बसलेल्या पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा 5 मार्च रोजी मार्ग मोकळा होणार आहे. येत्या 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदाची नावे जाहीर होणार असून यामध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी तिकीट देण्यावरून सर्वच राजकीय पक्षात आणि विशेष करून शिवसेना भाजप पक्षामध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता. शिंदेच्या शिवसेनेमध्ये अनेकांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर काही बंडखोरांनी आपला अर्ज मागे देखील घेतला होता.त्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यांना विविध समित्यांमध्ये किंवा स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

त्यानुसार आता येत्या 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे नावे जाहीर करण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले आहे. संख्याबळानुसार, शिंदेच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या पक्षातील 6 जनांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. उबाठा पक्षाचा केवळ एकमेव नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून एकालाही ही लॉटरी लागणार नाही.

भाजपचे 28 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून 2, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आल्याने त्यांचे 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षाचे 1 असे एकूण 10 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. मात्र ही लॉटरी कोणाला लागणार हे येत्या 5 मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT