Thane Mulund new railway station Pudhari
ठाणे

Thane Mulund new railway station: ठाणे-मुलुंड विस्तारित रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा

रेल्वे स्थानकाच्या कामासाठी 256 कोटींची आर्थिक तरतूद करण्यास रेल्वे बोर्डाची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मागील अनेक वर्ष रखडलेल्या ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या विस्तारीत रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे स्थानकाच्या कामासाठी नुकतीच रेल्वे बोर्डाने आर्थिक तरतूद देण्यास मान्यता दिली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन वरील प्रवशांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या रेल्वे स्टेशन वरून दर दिवशी किमान 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे मुलुंड आणि ठाणे दरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्टेशन बनविनायचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देखिल मिळाली होती.

नवीन स्टेशन परिसराचा विकास स्मार्ट सिटी योजने अंतर्गत ठाणे महापालिकेने केला असून रेल्वे स्टेशन बांधण्याची जबाबदारी रेल्वेकडे देण्यात आली होती, त्याकरिता ठाणे महापालिका 190 कोटी रेल्वेला देणार होती. परंतु मागील अनेक वर्ष महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनल्याने महापालिकेने रेल्वे प्रशासनाला आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती, परंतु रेल्वे मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मागिल अनेक वर्ष रेल्वे स्टेशनचा प्रश्न प्रलंबित होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची मागिल वर्षी 24 जुलै रोजी भेट घेऊन आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती. त्याला यश आले असून बैठकीत विस्तारीत रेल्वे स्टेशन करिता रेल्वे 256 कोटींचा निधी देणार असून त्याची निविदा देखिल रेल्वे मंत्रालय काढणार आहे. ठाणे महापालिका या कामावर देखरेख ठेवण्याचे काम करणार असल्याचे बैठकीत ठराविण्यात आले असून पुढील 2029 पर्यंत हे रेल्वे स्टेशन ठाणेकरांच्या सेवेत दखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे रेल्वे स्टेशन झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्टेशनचा भार कमी होईल, वागळे, घोडबंदर, वर्तकनगर वसंत विहार या भागातील नागरिकांचा प्रवास काही मिनिटावर येणार आहे. ठाणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी देखिल निम्यावर येऊन प्रवाशांना या नवीन स्थानकामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

असे असेल नवीन विस्तारित रेल्वे स्थानक

  • संपूर्ण ठाणे स्थानक 14.83 एकर जागेवर होणार असून त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला अधिक 2 मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे.

  • या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे.

  • या स्थानकात तीन पादचारी पुल असणार आहेत.

  • परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे.

  • स्टेशन इमारती समोर 150 मीटर लांब व 34 मीटर रुंद असा सॅटिस डेक असणार आहे

  • 2.5 एकर जागेमध्ये 250 चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे.

  • स्थानकाला जोडणाऱ्या 3 मार्गीका

  • पहिली मार्गिका नविन ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून अप डाऊन असणार आहेत. त्या हायवे पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.

  • दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे.

  • स तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.

प्रकल्पाचे फायदे

  • नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत.

  • ठाणे स्थानकातील सुमारे 31 टक्के आणि मुलुंड स्थानकातील 21 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT