ठाणे : पत्नीच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या सहाय्याने तक्रारदार पतीला पत्नीने बाळकुम साकेत रोड, स्मशान भुमीजवळ बोलावले.रिक्षात घालून मुंब्रा रेतीबंदर येथे नेऊन पतीला बेदम मारहाण करून नंतर त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने खारीगाव खाडीत फेकून दिले. सदरची घटना 21 सप्टेंबर रोजी रात्री घडली. उपचार घेतल्यानंतर तक्रारदार पतीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात पत्नी व तिचा प्रियकर व अन्य दोन सहकारी अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारदार पती बदलापूर येथे वास्तव्यास असून यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांची पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सदरची माहिती पतीला माहिती पडताच प्रेमप्रकरणात अडथळा ठरणार्या पतीला ठार मारण्याचा कट रचून पतीला रेतीबंदर येथे आणून बेदम मारहाण केली. नंतर खारेगाव खाडी पुलावर आणून प्रियकर व दोन मित्रांनी तक्रारदार पतीला खाडीत फेकून दिले. पोहता येत नसल्याने वाहत तो हा खाडीतील सिमेंटच्या खांबाला पकडून थांबला. मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढून कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.