ठाणे

Thane News: दिवाळीसाठी नातेवाईकांकडे गेलेल्या मुलीचे टिटवाळा स्थानकाजवळून अपहरण

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वे मार्गावरील इगतपुरी ते टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एका तरूणाने त्याच्या 15 वर्षीय मैत्रिणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टिटवाळ्याजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबल्यानंतर त्याने या मुलीचे अपहरण केल्याचे कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून समोर आले आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्या तरूणावर गुन्हा नोंदवून त्याच्यासह अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी तपासचक्रांना वेग दिला आहे. Thane News

प्रशांत सोनावणे असे गुन्हा दाखल तरूणाचे नाव आहे. तर अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी डोंबिवलीत शेलार नाका परिसरात तिच्या कुटुंबीयांसह राहते. या मुलीचे एका तरूणाशी प्रेमसंबंध जुळले आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने ही मुलगी इगतपुरी येथील आपल्या नातेवाईकांकडे पाहुणी म्हणून गेली होती. 12 नोव्हेंबर रोजी या मुलीने डोंबिवलीत घरच्यांना फोन करून मी पुष्पक एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात उतरून तेथून लोकलने डोंबिवलीत येत असल्याची माहिती दिली. ठरल्या वेळेत कुटुंबीय मुलीची वाट पाहत होते. Thane News

पुष्पक एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दोन तास उलटले तरी मुलगी घरी आली नाही. म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. इगतपुरीच्या नातेवाईकांनी मुलगी पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणला गेल्याचे सांगितले. हे ऐकून कुटुंबीय अधिकच घाबरले. रात्रीचे  अकरा वाजले तरी मुलगी घरी आली नाही. तिचा मोबाईल बंद येत होता. मुलीच्या वडिलांनी तिच्या एका मैत्रिणीशी संपर्क साधला. त्या मैत्रिणीने धक्कादायक माहिती दिली. टिटवाळ्यात एक्स्प्रेसला सिग्नलमुळे थांबा मिळाला.

त्यावेळी मुलगी एक्स्प्रेसमधून उतरली. तेथून ती रेल्वे मार्गातून चालत जाऊन मित्र प्रशांत सोनावणे सोबत गेल्याचे मैत्रिणीने सांगितले. मुलगी टिटवाळ्यात देवदर्शन करून किंवा तेथे फिरून घरी येईल, असे कुटुंबीयांना वाटले. चार दिवस उलटूनही मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीय भयभीत झाले होते. अखेर बेपत्ता मुलीच्या कुटुंबीयांनी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुरुवारी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. प्रशांत याने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचे सदर तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने तपासचक्रांना वेग दिला असून अपहृत मुलगी आणि तिच्या अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT