बोईसर : बोईसर जवळील खैरेपाडा येथील कचराभूमीला पुन्हा आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बोईसर जवळील खैरे पाडा ग्रामपंचायत हद्दीतील रोजचा जमा होणारा कचरा खैरे पाडा मैदानाच्या एका बाजूला टाकण्यात आला आहे. गेली अनेक वर्षांपासून टाकण्यात येत असलेल्या कचर्यामुळे या ठिकाणी कचर्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. कचर्याच्या या ठिकाणांना वारंवार आग लागून होत असलेले प्रदूषण व त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. कचर्याच्या साठलेल्या ढिगाना पुन्हा आग लागली असून या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन रस्त्याने प्रवास करणारे वाहन चालक, प्रवासी त्रस्त आहेत.