ठाणे

ठाणे : आसनगावमध्ये बाप-लेकीची गळफास घेऊन आत्महत्या

backup backup

कसारा, पुढारी वृत्तसेवा : आसनगावमध्ये राहणार्‍या विकास सूर्यकांत केदारे (वय 34) याने आपल्या आर्या ह्या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीसह राहत्या घरी मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने लिहलेल्या पत्रात पोलिस, समाज व्यवस्था यावर गंभीर भाष्य केले आहे. या घटनेमुळे आसनगाव परीसरासह पुर्ण शहापुर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता. विकास आणि त्याची वयोवृद्ध आई अशा दोघांनीही या आरोपाखाली काही महिने जेलमध्ये काढले होते. ती घटना सहन करण्याच्या पलीकडची होती, असे उद्विग्न होऊन नमूद करत विकासने नैराश्यातून मुलीसह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.

विकास यांनी आपल्या लेकीसह राहत्या घरी मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर यात अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. दरम्यान, या सुसाईड नोटच्या आधारे शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT