ठाणे

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या गाडीत आढळला मृतदेह

निलेश पोतदार

ठाणे, पुढारी वृत्‍तसेवा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावाजवळ महाराष्ट्र शासनाच्या चारचाकी वाहनामध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नौपाडा पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीचे नाव नागेश जाधव (वय ३८) असून, महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेमध्ये वाहन चालक आहे.

मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ एका चारचाकी वाहनामध्ये हा मृतदेह होता. जिल्हा परिषदेमधील आपल्या अधिकाऱ्याला जाधव यांनी दुपारी कार्यालयात सोडले. त्या नंतर तो घटनास्थळी गेला. सदरचा वाहन चालक हा दारूच्या नशेत होता अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. तर त्याच्या गाडीच्या सीटखाली देखील मध्याची बाटली आढळून आली. सदरच्या वाहन चालकाने दारूचे अतिसेवन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील अधिक तपास नौपाडा पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT