ठाण्याच्या कचऱ्याला डायघर येथील प्रकल्पात गेल्या पंधरा दिवसांपासून आग लागली आहे. (छाया : शुभम साळुंके)
ठाणे

Thane Daighar Dumping Ground | डायघर ग्रामस्थ दोन दिवसात निर्णय जाहीर करणार

पंधवड्यापासून धुमसतेय आग! ग्रामस्थांसह भूमिपुत्र आक्रमक पावित्र्याचा तयारीत

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : शुभम साळुंके

ठाण्याच्या कचऱ्याला डायघर येथील प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून आग लागली आहे. या आगीच्या धुरामुळे डायघर ग्रामस्थ आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ देखील हैराण झाले आहेत. डम्पिंग वरील दूषित धुरामुळे घराबाहेर पडणं ग्रामस्थांसाठी अवघड झालं आहे. त्यामुळे सोमवारी (दि.24) रोजी ठाण्यात होणाऱ्या वन मंत्र्यांच्या जनता दरबारात डायघर ग्रामस्थ सहभाग नोंदवला आहे. (The Daighar dumping ground in Thane, Maharashtra is a site where the Thane Municipal Corporation (TMC) dumps waste)

लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं

ठाणे महापालिकेने डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पात कोणत्याही प्रकारची नियमितता नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य पसरलं होतं. या संदर्भात ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलन देखील केली परंतु ठाणे मनपाने दुर्लक्ष करत त्याठिकाणी मोठमोठे कचऱ्याचे डोंगर तयार केले. गेल्या काही दिवसांपासून डायघर येथील कचऱ्याच्या डोंगराला आग लागली आहे. आग लागल्यापासून लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं आहे. तर आमदार , खासदार यांनी ग्रामस्थांची भेट देखील घेतली नसल्याचे डायघर पंचक्रोशी समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितले होते. सोमवारी (दि.24) रोजी आज ठाण्याचे माजी पालकमंत्री व वन मंत्री गणेश नाईक हे जनता दरबार घेत आहेत. या जनता दरबारात डायघर ग्रामस्थ जाऊन आपल्याला ठाण्याच्या कचऱ्यापासून होत असलेल्या त्रासाचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवणार आहेत.

ग्रामस्थ आणि भूमिपुत्र संयुक्त बैठकीत भूमिका जाहीर करणार

(दि.24) रोजी सोमवारी होत असलेल्या या जनता दरबाराच्या संदर्भात डायघर ग्रामस्थ योगेश पाटील म्हणाले की, डम्पिंग ग्राउंडला गेल्या पंधरा दिवसांपासून आग लागली आहे. या धुमसलेल्या आगीमुळे प्रचंड धूर येत असून त्याचा ग्रामस्थांना व आजूबाजूच्या परिसराला त्रास सहन करावा लागत आहे. आज आम्ही ग्रामस्थ ठाण्यात होणाऱ्या वनमंत्र्यांच्या जनता दरबारात सहभागी झालो आहोत. त्यांच्यासमोर आम्ही आमचे जे काही गाऱ्हाणे सांगणार आहोत. त्यांच्याकडून आम्हाला कोणता निर्णय येतोय याकडे आमचं सर्वांच लक्ष आहे. त्यानंतर आम्ही ग्रामस्थ आणि भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक घेऊन आमची पुढील भूमिका जाहीर करणार अस सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वन मंत्र्यांच्या भूमिकेकडे आणि ग्रामस्थांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT