ठाणे/मुंबई: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महामुंबई प्रदेश दहीहंडीच्या जल्लोषात न्हाऊन-माखून निघाला. गोविंदा पथकांनी पाच ते नऊ थर रचत दिवसभर थरांवर थर रचले आणि एकेक थर वाढत जाताना महामुंबईकरांच्या काळजाचे ठोके चुकले.
या थरांवर कळस चढला तो ठाण्यात. जोगेश्वरी-मुंबईच्या आर्यन गोविंदा पथकाने मनसेच्या दहीहंडी उत्सवात दहा थरांची सलामी देत गतवर्षीच्या विक्रमाला पुन्हा गवसणी घातली.
ठाण्यात सकाळपासूनच नऊ थरांची सलामी महत्वाच्या दहीहंडी पथकांनी दिली. शिवगणेश गोविंदा मंडळ, ठाणे, साईराम जोगेश्वरी, ओंकार गिरगाव, संकल्प अशा मंडळांनी नऊ थरांचा विक्रम कायम ठेवला.
नौपाड्यातील मनसेच्या दहीहंडीमध्ये साई राम गोविंदा पथकाने तब्बल नऊ थर यशस्वीरीत्या रचत दणदणीत कामगिरी केली. आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रामनगरचा राजा गोविंदा पथकाने सर्वप्रथम नऊ थरांची सलामी देत मोठ्या बक्षिसावर आपले नाव कोरले.
प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मानाच्या दहीहंडीतही शिवगणेश गोविंदा पथकाने नऊ थरांचा थरार सादर केला. पथकाच्या या दमदार कामगिरीने दहीहंडीच्या ठिकाणी उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली.
तर ठाण्याच्या ऐतिहासिक टेंभी नाका येथील दिघे साहेबांच्या दहीहंडीत खोपटचा राजा गोविंदा पथकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नऊ थरांची सलामी देत मान पटकावला.
यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले ते महिला गोविंदा पथकाचे सात थरांचे धाडस. ठाण्यात पहिल्यांदाच शिवतेज महिला गोविंदा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला. ठाण्यात आर्यन गोविंदा पथकाने 10 थर रचत विक्रमाची पुनरावृत्ती केली, तर अनेक पथकांनी 9 थरांची सलामी दिली.