चोवीस वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या संशयितास पोलिसांनी हुडकून काढून गजाआड केले आहे. pudhari news network
ठाणे

Thane Crime News : बलात्कारातील आरोपी 24 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : चुलत भावाच्या लग्नाला आलेल्या एका महिलेवर 21 मे 2001 रोजी बलात्कार करून गेल्या चोवीस वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या एका आरोपीला पोलिसांनी हुडकून काढून गजाआड केले आहे. ही कामगिरी विरार पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, वसईच्या ग्रामीण भागातील एका गावात आपल्या चुलत भावाच्या लग्नाला आलेल्या एका महिलेवर 21 मे 20021 रोजी पहाटे 05.30 वा. चे सुमारास 5 (पाच) आरोपीने महिलेवर शेतात नेऊन अत्याचार केला. याबाबत विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकारच्या जुन्या परंतु गंभीर गुन्ह्यातील केसेस निकाली काढण्याचे आदेश मीरा भाईंदर पोलीस आयुक्तल्याकडून त्या अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांना आयुक्तांनी दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारांकडुन माहिती काढुन 24 वर्षापासुन 376 (बलात्कार) सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपी शांताराम विणा (इनु) वरटा, वय 49 वर्षे याला शिताफीने पकडले. शांताराम हा नातेवाईकानां भेटण्याकरिता अधुन मधुन त्याच्या जन्म गावी येतो ही माहीती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचुन आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने बारकाईने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देऊन तो मागील 24 वर्षापासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत असल्याचे उघड केले आहे.

या गुन्ह्यातील इतर चार आरोपींना या अगोदर न्यायालयाने 19 नोव्हेंबर 2005 रोजी दोषी ठरवुन प्रत्येकी 5 वर्षे सक्त मजुरी व 2 हजार रु. दंड, दंड न भरल्यास 6 महिने सक्त मजुरी व कलम 323 मध्ये 1 वर्षे साधी कैद व 500 रु. दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा दिली होती. तर फरार शांताराम याला 17 ऑगस्ट 2024 रोजी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे .

ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस उपनिरीक्षक भाऊ डुबे, सहायक फौजदार विजय सुर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील तसेच पोलीस अंमलदार संदिप शेळके, मोहसीन दिवाण, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, प्रफुल सोनार यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT