Thane crime 
ठाणे

Thane crime: डोंबिवलीतील हॉटेल जिम्मी लाऊंजवर केडीएमसीची कारवाई

गोल्डन प्लाझा इमारतीच्या आठव्या मजल्यावर जिम्मी व्हेज रेस्टो बार आहे

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पूर्वेकडे बाजीप्रभू चौकात असलेल्या हॉटेल जिम्मी वेज रेस्टो लाऊंजवर शनिवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी त्यांच्या अतिक्रमण पथकामार्फत कारवाई केली. गोल्डन प्लाझा इमारतीच्या आठव्या मजल्यावर जिम्मी व्हेज रेस्टो बार आहे. बारमालक महेंद्र गांधी केडीएमसीची परवानगी न घेता अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

स्थानिक नगरसेविका रंजना पेणकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच त्यांनी याप्रकरणी बार मालकाला आवश्यक त्या कागदपत्रांसह सुनावणीसाठी बोलावले. सुनावणीमध्ये संबंधित बार मालकाने टेरेस शेडला नगररचना विभागाची परवानगी तसेच अग्निशमन विभागाची परवानगी घेतलेली दिसून आली नाही. त्यामुळे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदरचे शेड अनधिकृत ठरवून ते बारमालक महेंद्र गांधी यांना काढून घेण्याबाबत फर्मावले.

दोनदा नोटीसा देऊन देखील महेंद्र गांधी यांनी अनधिकृत शेड हटवले नाही. त्यानंतर शनिवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक आयुक्त प्रसाद  ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात सदर अनधिकृत टेरेस शेड अतिक्रमण नियंत्रण विभागाचे पथकप्रमुख राजू शेलार, नरेश भोईर, ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अभिमन पवार यांच्या साह्याने साह्याने तोडून टाकले.

कारवाईदरम्यान प्रभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षक उपस्थित होते. नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT