अंबरनाथ : ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेतून भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या भाजपा उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर मंगळवारी 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञाता कडून चार राऊंड फायर करण्यात आले होते. यावेळी पवन वाळेकर आपल्या कार्यालयातच होते. सुदैवाने या गोळीबार हल्ल्यातून ते सुखरूप बचावले. मात्र गोळीबार करणारे आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांचे हात रिकामेच आहेत.
अंबरनाथ मधील पवन वाळेकर व त्याचे काका अरविंद वाळेकर यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. यातूनच पवन यांचे तिकीट शिवसेनेतून कापण्यात आल्याने त्याने ऐन निवडणुकीत भाजपा मध्ये प्रवेश केला. पवन यांना भाजपा ने त्याच प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी दिली. त्यामुळे अरविंद वाळेकर यांचा मुलगा निखिल वाळेकर व पवन वाळेकर हे दोघे सख्खे चुलत भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे हा प्रभाग संवेदनशील झाला होता.
त्यातच 16 डिसेंबर रोजी पवन त्याच्या नवीन भेंडीपाडा परिसरातील कार्यालयात बसले असताना त्यांच्या कार्यालयावर अज्ञात दुचाकीवरील दोघांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर बेशूट गोळीबार केला. या हल्ल्यात पवन सुखरूप बचावले. या गोळीबाराने मात्र या परिसरात तणावाचे वातावरण होते.
गोळीबार करताना मारेकरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने पोलीस त्यांना तात्काळ अटक करतील अशी अपेक्षा होती. मात्र तब्बल दहा दिवसानंतर देखील आरोपी पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस अधिकारी मात्र तपास सुरू आहे. इतकेच बोलत आहेत. या निवडणुकीत पवन वाळेकर यांनी त्याचेच चुलत भाऊ निखिल याचा दारुण पराभव करून पॅनल क्र 4 हे संपुर्ण निवडून देखील आणले. त्यामुळे हा पराभव व नगराध्यक्ष पदाचा पराभव अरविंद वाळेकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.