Pradeep Purnekar case Pudhari
ठाणे

Pradeep Purnekar Case: टल्ली आणि पपलू दोघांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

मोबाईल फोन आणि रक्ताने माखलेले कपडे हस्तगत करायचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे; दोन्ही आरोपींना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे न्यायालयात गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यातील युक्तीवाद आणि अपुऱ्या तपासामुळे ठाणे सत्र न्यायालयाने आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि आरोपी अमित सिंग उर्फ पपलू दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केलेली आहे.

गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयात सरकारी वकील यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. न्यायालयाला सांगितले, दोन्ही आरोपींचे मोबाईल देखील हस्तगत करायचे आहेत.

त्याचबरोबर हत्येच्या वेळी वापरण्यात आलेले रक्ताने माखलेले कपडेही मिळवायचे आहेत. तसेच या प्रकरणात दोन व्हिडीओ समोर आलेले आहेत. तेव्हा तपासासाठी तीन दिवसाची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलाने केली.

त्यानंतर यावर न्यायालयात फिर्यादीचे वकील समीर हाटले युक्तीवादात म्हणाले, आरोपीना मुळशी गावी नेण्यात आलेले होते. संबंधित घटना आणि व्हिडिओ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील आहेत.

दोन व्हिडिओ पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. एका व्हिडिओत वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र दिसत असल्याचा युक्तीवाद केला. दरम्यान न्यायमूर्तीनी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ केलेली आहे. दोन्ही आरोपीना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT