ठाणे

Vinayak Raut Bail | जादूटोणा प्रकरण : विनायक राऊत पिता-पुत्रासह सहा जणांना अटकपूर्व जामीन

सून गिरीजा राऊत यांनी त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरोधात गंभीर आरोप करत कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Witchcraft Ban Act Case

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात दाखल गुन्ह्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि.७) राऊत पिता-पुत्रांसह सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरोधात गंभीर आरोप करत कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कौटुंबिक हिंसाचार तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्यात विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यासह एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले असून त्यामध्ये दोन कथित भोंदू बाबांचाही समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपी फिरोज शेख आणि त्याच्या एका साथीदाराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथून अटक केली होती.

दरम्यान, या प्रकरणात अटक टाळण्यासाठी विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्यासह अन्य आरोपींनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राऊत पिता-पुत्रांसह सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT