Bhiwandi Workers Die in Manhole Pudhari
ठाणे

Bhiwandi Workers Death | भिवंडीत ड्रेनेजच्या मेनहोलमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

ठेकेदारासह ईगल इन्फ्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Bhiwandi Workers Die in Manhole

भिवंडी : शहरातील कामतघर परिसरातील फेणेपाडा येथे ड्रेनेज लाईनची सफाई करताना मेनहोलमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ड्रेनेज सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना केवळ तुटपुंजी आर्थिक मदत देऊन जबाबदारी झटकू नये, तर त्यांना योग्य आणि सन्मानजनक आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारासह ईगल इन्फ्रा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. ड्रेनेज सफाईचे काम करताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, त्यांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आली होती का आणि या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे?, याची सखोल चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कामगारांच्या जीवाशी संबंधित सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेता कामा नये. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नगरसेवक कमलाकर पाटील यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT