Thane Bhayander leopard attack
भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरात बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिरकाव करीत एका तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात बिबट्याने तरुणीच्या गळ्यावर व हातावर गंभीर इजा केल्या असून तिला उपचारार्थ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्या जखमी तरुणीच्या इमारतीत शिरला होता. त्याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर हल्ला केला. अग्निशमन दलाने त्या तरुणीला खिडकीची ग्रील तोडून बाहेर काढले. तर बिबट्याला त्याच इमारतीचे प्रवेशद्वार बंद करून इमारतीतच बंदिस्त करून ठेवले आहे.
बिबट्याने नागरी वस्तीत प्रवेश केल्याची ही दुसरी घटना असून यापूर्वी त्याने भाईंदर पश्चिमेला रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करून एका श्वानाला ठार केले होते. याबाबत वन विभागाच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.