ठाणे

ठाणे: कसारा घाटात ४ वाहनांचा विचित्र अपघात; २ जण जखमी

अविनाश सुतार

कसारा, पुढारी वृत्तसेवा: नाशिक – मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बससह अन्य 3 गाड्यांच्या अपघात झाला. या अपघातात २ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कसारा घाटात एका काळी पिवळी गाडी (एमएच 12 एफ झेड 1678) घाट उतरत होती. यावेळी ओव्हर टेक करणाऱ्या ट्रकने (सीजी 10 एएस 6163) गाडीला धडक दिली. त्यानंतर लगेच ट्रकला मागून शिर्डीहून परळला जाणाऱ्या बसने (एमएच 09 ई एम 9478) धडक दिली. तर या बसला मागून ट्रकने (युपी 65 इटी 3978) धडक दिली.

या विचित्र अपघातात बसने पेट घेतला. परंतु, प्रसंगावधान राखत बसमधील प्रवासी खाली उतरले. या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य शाम धुमाळ, दत्ता वाताडे, शरद काळे, देवा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. बस चालकाच्या मदतीने आग तत्काळ विझविण्यात आली. दरम्यान, दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, या अपघताची माहिती मिळताच कसारा उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी रमेश तडवी, महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे पीएसआय पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT