ठाणे

ठाणे : भिवंडीत हत्तीरोगाचा फैलाव ; आत्तापर्यंत २३ रूग्ण आढळले

मोनिका क्षीरसागर

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा
भिवंडी तालुक्यात हत्तीरोगाने थैमान घातला आहे. आत्तापर्यंत २३ हत्तीरोगाचे रूग्ण याठीकाणी आढळले असून, ठाणे जिल्ह्यात हत्तीरोगाचे एकूण ४३ रूग्ण आहेत. भिवंडीत हत्तीरोगाचा फैलाव  झाल्यामुळे जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम २०२२ अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा सोमवारी (दि.२३) उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नगरे यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२१ मध्ये सहा ते सात वर्ष वयोगटातील निवडक मुलांची तपासणी करण्यात आली होती. त्यात ठाणे जिल्ह्यातील ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळले असून, त्यात भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक २३ बालके आहेत.

मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्धांना हत्तीरोगापासून मुक्त करण्यासाठी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळयांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT