Shahapur Government Ashram Schools pudhari photo
ठाणे

Shahapur Government Ashram Schools : दुरुस्तीच्या कामांवर खर्च, तरी आश्रमशाळांची अवस्था बिकट

मुदत संपूनही इमारतींची कामे रखडली

पुढारी वृत्तसेवा

डोळखांब : दिनेश कांबळे

शहापुरात शासकीय आश्रमशाळांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. शहापूर या आदिवासी, दुर्गम व डोंगराळ तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा दुरुस्ती व नवीन बांधकामांवर दोन दोन लेखाशिर्षाखाली काम करूनही आश्रमशाळांची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत एकूण २३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. तर ९ हजार ५०० एवढी विद्यार्थी संख्या समाविष्ट आहे. असे असताना तालुक्यातील डोळखांबसारख्या आश्रमशाळेची तसेच इतर शाळांची देखील दुरवस्था झाल्याचे पहायला मिळते. मात्र, कळत-नकळत याचा दुष्परिणाम विद्यार्थांची मानसिकता, गुणवत्ता, शिक्षणा विषयीची आवड यावर होत असल्याचे पाहायला मिळते.

डोळखांब, माळ, टाकीपठार, कुल्हे यासारख्या शाळातील स्वच्छता गृह, रंगरंगोटी, आदींची दुरवस्था झालेली पाहायला मिळते. सद्या विद्यार्थ्‍यांना दर्जेदार जेवण मिळत असेल. तरी बसण्याची व्यवस्था नाही. वर्षभरात एकूण सात ते आठ लेखाशिर्षाखाली तातडीने खर्च करण्याचा अधिकार शाळा प्रशासनाला असताना देखील संबंधित खर्च नेमका कुठे व कसा खर्च केला जातो याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

विशेषत: तालुक्यात आदिवासी उपाययोजनेच्या अंतर्गत कुल्हे (शेणवे), टाकीपठार, सारख्या बहुतांशी शाळांचे इमारतीचे काम सुरू असले तरी कामांची मुदत संपूनही काम रखडली आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थांची गैरसोय होत आहे.

विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान...

काही ठिकाणी तर लेटलतिफ शिक्षकांमुळे विद्यार्थांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होताना दिसून येत आहे. आश्रमशाळांची दुरवस्था आणि आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्‍यांकरिता शासन विविध मार्गाने करोडो रुपयांचा चुराडा करीत असताना शासनाचा हेतू मात्र सफल होताना दिसून येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT