डोळखांब : दिनेश कांबळे
रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांचे समाधी स्थळ असलेल्या शहापूर तालुक्यातील आजोबा देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च होऊनही नादुरुस्त रस्त्यामुळे देवस्थानकडे पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.तर विविध लेखाशिर्षाखाली खर्च होऊनही याठिकाणी सुविधांचा अभाव असल्यामुळे भाविका-पर्यटकांची व येणाऱ्या निसर्गप्रेमिंची मोठी गैरसोय होत आहे.
शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील गुंडे तसेच डेहणे ग्रामपंचायत हद्दीतील उदासिन पंथाची गादी असणारे आजोबा देवस्थान आहे. याठिकाणी प्रभु रामचंद्र यांचे जन्माचे आधी रामायण ग्रंथाची रचना करणारे महर्षी वाल्मिक ऋषी यांचे समाधी स्थळ आहे. वरती लवकुशाचा पाळणा असल्याने त्यांचा जन्म याच ठिकाणी झाल्याची आख्यायीका आहे. तसेच चौदा वर्षाचा वनवास संपल्या नंतर सितामाईंना एका धोब्याचे निंदेनुसार याच जंगलात पुन्हा वनवासाला सोडल्याची आख्यायीका आहे.
ग्रामपंचायतमधील महत्वाचे गावांचा तुळसी रामायणा मध्ये उल्लेख देखील आहे. मात्र देवस्थानचे मालकिची शेकडो एकर जागेवर शासकीय ट्रस्टचा अधिकार असुन या ट्रस्टवर स्वतः तहसीलदार अध्यक्ष असतांना देखील देवस्थानचे उत्पन्नातून साधा देवाचे दिवाबत्तीचा खर्चही मिळत नसल्याचे भाविकांचे मत आहे.याठिकाणी विविध औषधी वनस्पती, वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी,माकड,हरूण,भेतर,निलगायी,बिबट्या यासारखे प्राणी आहेत.साग ,खैर यासारखी किमती वृक्ष आजमितीस नजरेआड झाली आहेत.
वन विभाग व वनव्यवस्थापन कमिटी कडुन केला जाणारा खर्च केवळ कागदोपत्री होत असल्याने येथील ध्यानगृह, धर्मशाळा , पुरातन वास्तु, सितामाईचे हाताची निशाणी असलेला भला मोठा दगड ,कुंडाकडे जाणार्या दगडी तोडींचा रस्ता छोटी मंदिरे यांची अवस्था कठिण आहे. येथील जल कुंभाचे विस्तारीकरण केले तर तर ग्रामपंचायत हद्दीतील सोळा पाडे आणी चार गावांना गुरूत्वाकर्षण पध्दतीने पिण्याचे पाणी पोहचवता येईल. पक्षी निरिक्षण केंद्र,स्वच्छता गृह,चेंजिग रूम ,वहान तळ, तसेच वनविभागाची कँटीग अथवा भोजनालय त्याचप्रमाणे भक्त निवास अशा पध्दतीच्या सुविधा उपलब्ध झाल्या तर याठिकाणी येणाऱ्या भाविकांची ,निसर्ग प्रेमिंची तसेच पर्यटकांची गैरसोय होणार नाही.
सितामाईचे पाळण्याकडे व्यवस्था ़असावी अशी टाकेश्वर मठाधिपती योगी प.पु.फुलनाथ महाराज यांची मनोमन इच्छा आहे. याठिकाणी रोषणाईची व्यवस्था व्हावी तसेच मंजुर काम पाच सहा वर्षापासून रखडले असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे खा.बाळ्यामामा म्हात्रे यांना दिली.त्याअनुषंगाने विज मंडळाचे अधिकार्यांशी संपर्क करून खा.म्हात्रे यांनी रोषणाई चे काम मार्गी लावले आहे.
अंदाज पत्रकानुसार काम नाहीच
अशा या निसर्ग रम्य व पर्यटन किंवा तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशा देवस्थानाची आज दुरावस्था झाल्याचे पहायला मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी रस्त्याचे कामासाठी लाखो रूपये खर्च होवूनही रस्ता जैसे थे आहे. त्यामुळे याठिकाणी सुखरूप पोहचता येत नाही. सुशोभिकरणासाठी अर्धा कोटी पेक्षा खर्च होवूनही प्रत्यक्ष अंदाज पत्रकार नुसार काम झाले नसल्याने थातुरमातुर सुशोभीकरण झाले आहे.
तर भाविकांची वर्दळ वाढेल
आजही येथील दोन स्नानकुंड, व ध्यान केंद्र, पुरातन वास्तु, यांचे सुशोभीकरण होणे देखील तितकेच महत्वाचे आहे. खऱ्या अर्थाने येथील देवस्थानाची विकास झाला. आणी येथे येणार्या भाविकांची वर्दळ वाढली. तर गुंडे ,डेहणे ग्रा. पं. हद्दीतील सोळा पाडे आणी चार गावांतील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच पर्यायाने त्यांचा सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक विकास होईल .आणी आर्थिक स्तर देखील उंचावेल.