जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींचीच मुलं इंग्रजी शाळेत असल्याची माहिती समोर Pudhari File Photo
ठाणे

Semi English Municipal School : कल्याण-डोंबिवलीत सेमी इंग्रजी शिक्षणाची लाट

गरीब विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी मनपा शाळेत प्रवेश मिळेल का?

पुढारी वृत्तसेवा

semi-English education Kalyan-Dombivli Muncipal School

डोंबिवली शहरः संस्कृती शेलार

आपल्या मुलालाही इंग्रजी शाळेत घालावं, असं अनेक पालकाचं स्वप्न असतं. मात्र, खिशाला परवडणाऱ्या फी नसल्यामुळे हे स्वप्न अनेक गरीब व मध्यमवर्गीय पालकांना गमवावं लागतं. मात्र आता या स्वप्नांना हातपाय फुटणार आहेत, ते ही महानगरपालिकेच्या शाळांमधून! कल्याण -डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ७ सेमी इंग्लिश शाळा सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली, तिसगाव, पाथर्ली, उंबर्डे, बारावे, मांडा आणि मोठागाव या परिसरातील शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण सुरू होऊन, नव्या शैक्षणिक पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे. या शाळांमध्ये माध्यम मराठीच कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र गणित व विज्ञान हे निवडक विषय इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच पुढील स्पर्धात्मक शिक्षणासाठी बळ मिळणार आहे.

या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अगदी सोपी आणि पारदर्शक ठेवण्यात आली आहे. शिक्षण सुरू होताच, विद्याथ्यर्थ्यांना वह्या, पुस्तकं, दप्तर, मोजे, बूट या सर्व गोष्टी मोफत दिल्या जातील. 'निपुण भारत अभियान' अंतर्गत प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय 'विनोबा भावे अॅप'च्या माध्यमातून शाळेचं डिजिटल मॉनिटरिंग करण्यात येणार आहे.

आजकाल प्रत्येक पालकाच्या मनात असतं की, आपलं मूल इंग्रजी शाळेत शिकावं. मात्र खर्च परवडत नसल्यामुळे त्यांना तसं करता येत नाही. त्यामुळेच ही काळाची गरज ओळखून आपण महापालिकेच्या काही शाळांमध्ये 'सेमी-इंग्लिश' अभ्यासक्रम सुरू करत आहोत. आपण मराठी शाळा बंद करत नाही आहोत. त्या शाळा मराठीच राहतील. फक्त त्यामधील काही विषय इंग्रजीतून शिकवले जातील.
- संजय जाधव, उपायुक्त
आम्ही रोज मजुरी करून पोट भरतो. इंग्रजी शाळा परवडत नाही, म्हणून मुलं मराठी शाळेतच घातली. आता जर खरंच महानगरपालिकेची शाळा सेमी इंग्रजी झाली तर आमच्यासाठी ती मोठी गोष्ट असेल.
- रामदास ढोबरे, पालक
आजकाल इंटरव्ह्यू, मोबाइल, सरकारी फॉर्म, सगळीकडे इंग्रजी लागतं. माझ्या मुलीला शिकवायचं आहे, पण दर महिन्याची फी परवडत नाही. आता पालिकेच्या सेमी इंग्लिश शाळेबद्दल कळलं, तेव्हा आनंद झाला. गरीब लोकांचीही स्वप्नं असतात, आणि आता ती खरं होणार वाटतेय.
- वंदना नाईक, पालक

कोणत्या शाळांमध्ये सुरू होणार हा उपक्रम ?

शालेय वर्ष २०२५-२६ पासून खालील महापालिका शाळांमध्ये सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

१. मनपा शाळा क्र. १९ नेतिवली, कल्याण (पूर्व)

२. मनपा शाळा क्र. १८ तिसगाव, कल्याण (पूर्व)

३. मनपा शाळा क्र. ६२ पाथीं, डोंबिवली (पूर्व)

४. मनपा शाळा क्र. १२ उंबर्डे, कल्याण (पश्चिम)

५. मनपा शाळा क्र. ६८ बारावे, कल्याण (पश्चिम)

६. मनपा शाळा क्र. ६० मांडा, टिटवाळा (पूर्व)

७. मनपा शाळा क्र. २० मोठागाव, ठाकुर्ली, डोंबिवली (पश्चिम)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT