ठाणे, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून राज्यभर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे ठिक-ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच मुंबईमध्ये तसेच उपनगरांत पावसाने चांगलेत छोडपले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. पुढील 24 तासांसाठी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशोक शिनगारे यांनी उद्या शुक्रवारी (दि.26) ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.याबरोबरच जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोकापातळी ओलांडली आहे.
याबरोबरच भारतीय हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यात पुढील २४ तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशोक शिनगारे यांनी उद्या शुक्रवारी (दि.26) ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम आदेश देण्यात आले आहेत.