ठाणे

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक

अविनाश सुतार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम काढण्यात आले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. उड्डाणपुलामधील एक्स्पान्शनमधील बेरिंगचा पार्ट निखळल्याने पूल अधिक हलू लागल्याने या पुलावरील वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत या मार्गावरून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. Mumbai-Nashik highway

आज (दि.२३) सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी पूल हलतो आहे, धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तत्काळ प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करून याची पाहणी केली. पुलाच्या पाहणीनंतर एक्सपानशन जॉईंट आहे. त्यामधील बेरिंग निखळून खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच पूल हलण्याचे प्रमाण वाढले आहे. हा पूल कॅन्टीलीव्हर पद्धतीचा असल्याने आणि जोडण्या असल्याने हा हलतोच. मात्र, जॉईंटमधली बेरिंग तुटल्याने जास्त हलतो आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.  दुरूस्तीच्या कामासाठी अंदाजे 6 ते 7 दिवसांचा वेळ लागणार असून त्याकरिता वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. पुलावरील नाशिक दिशेकडूल एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे, असे राठोड यांनी सांगितले. Mumbai-Nashik highway

मनसेमुळे टळला अनर्थ…

साकेत उड्डाणपूल जास्त हलू लागल्याने सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी पदाधिकाऱ्यासमवेत या पुलाची पाहणी केली. हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली नाही, तर अधिकाऱ्यांनाच खाडीत फेकून देऊ, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

Mumbai-Nashik highway : रामदास आठवलेही थांबले पुलावर

ज्यावेळेस हा सर्व प्रकार लक्षात आला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले याच उड्डाणपुलावरून जात असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. यावेळी आठवले यांनी देखील या उड्डाणपुलाची पाहणी केली. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक असल्याचे सांगत या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सूचना देण्यात आल्या आहेत, असे आठवले यांनी यावेळी सांगितले.

या उड्डाणपुलाच्या एक्स्पान्शनमधील बेरींगचा पार्ट निखळून खाली पडला आहे . त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे एक लेन कमी करावी लागेल. मात्र, डावी उजवीकडील वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे. बेरिंगचा पार्ट निखळल्यामुळे पूल अधिक हलू लागला आहे.
– विनय राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT