डोळखांब : दिनेश कांबळे
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्याचे सरहद्दीवर शिरोशी गावच्या माथ्यावर असलेला नाथ सांप्रदायाची परंपरा असलेल्या माळ येथील साधु मठाला १३३ वर्षे पुर्ण झाली आहेत. हा मठ ठाणे जिल्ह्यातील नाथ पंथाची गादी असलेला सर्वात पहिला मठ आहे. परंतु याठिकाणी वाल्मिकी ऋर्षीचे लहान भाऊ शृंग ऋषी यांची रामायण काळातील समाधीस्थळ आहे. तर याठिकाणी साधू परंपरेच्या मठाला आज १३३ वर्षे पूर्ण होत आहेत.
शिरोशी येथील मल्हारराव देशमुख या सावकारांनी माळ गावातील आपला बंगला मोडुन याठिकाणी मठ तयार केला. याठिकाणी त्रंवकेश्वर याठिकाणी वैतरणी नदी काठी पुर्वी धर्मनाथ नावाने प्रसिध्द असलेले शिरोशी येथील साधू २४ वर्षे राहीले त्यांना माळ मठाधिपती म्हणून याठिकाणी आपल्यानंतर त्यांना वैतरणीनाथ या नावाने भाविक ओळखु लागले.
शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नाथ पंथातील बहुतांशी साधुंची दिक्षा माळ मठ याठिकाणी झाली. एवढेच नव्हे तर टाकेश्वर मठाधिपती ब्रम्हलिन योगी रिध्दीनाथ यांना याच मठावर गुरू शिलनाथ यांनी दिक्षा दिल्याचा व कानचिरा केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे हा मठ सर्वात आधीचा असुन त्यानंतर शहापुरातील चेरवली मठ व नंतर टाकिपठार मठ. बहुतांशी साधुंचा अनुग्रह चेरवली मठ येथे झाल्याचे सांगितले जाते.
माळ येथील वैतरणी नाथ यांचे गुरू पिक किसननाथ त्यानंतरची आजा गुरू, पंजा गुरू अशी दोन्ही तालुक्यात नाथ सांप्रदायाची वंशावळ तयार झाली. वैतरणी नाथ यांनी १८४७ ला याठिकाणी जिवंत समाधी घेतली असुन त्यांना अंदाजे १०७ वर्षे पुर्ण झाली आहेत. याठिकाणी त्रेतायुगात शृंगरूषी यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी याठिकाणी आपल्या आध्यात्मिक सामर्थाचे बळावर गंगा आणली आहे.
मुरबाड तालुक्यातील मुरब्याची वाडी याठिकाणी वाल्मिकी ऋषी यांचे भाऊ भृंगरूषी यांची समाधीस्थान आहे. तर माळ येथे शृंगरूषी यांची समाधी आहे. तसेच शहापूर तालुक्यातील आजोबा देवस्थान याठिकाणी वाल्मिकी ऋषी यांची समाधी असुन त्यांनी देखील याठिकाणी गंगा निर्माण केली आहे. याचाच अर्थ हे तिन ही भाऊ शहापूर आणि मुरबाड तालुक्यातच समाधिस्थ झाले आहेत.
तिनही देवस्थान सुविधांपासून वंचित
ही तिनही देवस्थान आजही निसर्गाचे सानिध्यात असून सोयीसुविधांच्या प्रतिक्षेत आहेत. याठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता, भाविकांना रहाण्याची व्यवस्था, भक्त निवास, सुलभस्वच्छता गृह, वाहनतळ, दिवाबत्ती, भोजन व्यवस्था किंवा देवस्थानचे देखभाली साठी लागणारा शासकीय खर्च, पक्षी निरिक्षण केंद्र यांसारख्या सुविधा आज पर्यंत उपलब्ध झालेल्या नाहीत.
काही देवस्थानचे ठिकाणी ठेकेदारांनी आपली बिल काढुन घेतली मात्र देवस्थानची काम अपुर्णावस्थेत आहेत. झालेली काम ही देखील अंदाजपत्रकात प्रमाणे झाल्याचे दिसत नाही. खऱ्या अर्थाने राजकीय इच्छा शक्तीच्या बळावर साक्षात विकास झाला तर परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होवुन त्यांचा आर्थिक, शैक्षणिक व मुलभुत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी मदत होईल हे देखील तितकेच खरे.