संशयित आरोपी चंद्रकात दिवेकर  Pudhari Photo
ठाणे

कल्याणात मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला अटक

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची भररस्त्यात छेड काढणाऱ्या रोडरोमियोला कोळसेवाडी पोलिसांनी गजाआड केले. चंद्रकात दिवेकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कल्याणच्या पूर्व भागात राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या बदमाशाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही मुलगी तिच्या घराच्या दिशेने जात होती. इतक्यात पाळतीवर असलेल्या या बदमाशाने तिचा पाठलाग तर केला. याबरोबरच मुलीला रस्त्यात अडवून या मुलीशी अश्लील आणि विभत्स कृत्य केले.

यानंतर बदमाशाच्या तावडीतून मुलीने कशीबशी सुटका करवून घेतली आणि घर गाठले. घडलेल्या प्रकाराने मुलगी प्रचंड भेदरली होती. हे पाहून पालकांनी तिची विचारपूस केली. मुलीची अवस्था पाहून पालकांनी बदमाशाला तात्काळ कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी पिडीत मुलीसह पालकांना धीर दिला. त्यानंतर पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग देऊन चंद्रकांत दिवेकर याला बेड्या ठोकल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT