Rewas Reddi Coastal 
ठाणे

Rewas Reddi Coastal Highway-४६ वर्षांनी मिळणार रेवस-रेड्डी सागरी महामार्गाला गती

एमएसआरडीसी बांधणार २४०० कोटींचा महामार्ग

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : माजी मुख्यमंत्री हैं. ए. आर. अंतुले यांनी पाहिलेले ४६ वर्षांचे रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे. मात्र, या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असल्याने राज्य सरकारने या महामार्गाची रेवस-हाशिवरे-पेढांबे-कार्लेखिंड-अलिबाग-रेवदंडा असा अलाईनमेंट (मार्ग) बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या नव्या ३६ किमी लांबीच्या रस्त्यासाठी २४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी १९८० रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली. मात्र अठरा महिन्यात त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याने प्रकल्प कागदावर राहिला. त्यानंतर प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयन्त झाला मात्र भूसंपादनात आलेल्या अडचणी, शेतकरी विरोध, निधी यांच्यासह अन्य कारणांमुळे महामार्गाला गती मिळू शकली एमएसआरडीसी बांधणार २४०० कोटींचा महामार्ग नाही. पूर्वीच्या आराखड्यानुसार या रस्त्याची अलाईनमेंट रेवस-चोंढी-अलिबाग-रेवदंडा' अशी होती. मात्र, या मार्गात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करावे लागणार होते.

आपल्या हक्काच्या बागायती आणि शेतजमिनी जाण्याच्या शक्यतेने स्थानिक शेतकऱ्यांनी या मूळ आराखड्याला कडाडून विरोध दर्शवला. शेतकऱ्यांच्या या विरोधाची आणि भावनांची दखल घेत, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी शासनाकडे हा मार्ग बदलण्याची आग्रही मागणी केली, ज्याला यश आले आहे.

मार्ग बदलाची प्रमुख कारणे

खासगी शेतजमिनीचे संपादन टाळून शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे, हे या बदलामागचे सर्वात मुख्य कारण असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. जुन्या मार्गावर अनेक वळणे होती. ती वळणे दूर करून रस्ता अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नव्या मार्गाचा पर्याय निवडण्यात शासकीय जमिनीतून आला. खाजगी जमिनीऐवजी जास्तीत जास्त रस्ता नेणे प्रशासकीयदृष्ट्या अधिक सोयीचे ठरणार आहे.

काही खाड्यांच्या आणि पुलांच्या नियोजित जुन्या अलाइनमेंटला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे मार्गात बदल करण्यात आले आहेत. कांदळवन आणि किनाऱ्यावरील जैवविविधता वाचवून मार्ग सुकर करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गाची सुरुवात अलिबाग तालुक्यापासून होणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्याऐवजी वळणे दूर करण्यासाठी मार्ग बदलण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT