Raj Thackeray Pudhari
ठाणे

Raj Thackeray Kalyan Dombivli Visit: राज ठाकरे २८ आणि २९ नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर

मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी साधणार थेट संवाद; डोंबिवली आणि कल्याणमध्ये बैठकांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा २८ व २९ नोव्हेंबर रोजी कल्याण-डोंबिवलीला दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांशी साधणार थेट संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवार २८ नोव्हेंबर आणि रविवार २९ नोव्हेंबर रोजी कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान शनिवार २८ तारखेला सायंकाळी ४ वाजता डोंबिवली पूर्व येथील प्रगती कॉलेज हॉल, दत्तनगर चौक येथे पक्षाचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची बैठक पार पडणार आहे.

या दोन्ही बैठकांमध्ये राज ठाकरे उपस्थित पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. यावेळी पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय व संघटनात्मक नियोजन, स्थानिक प्रश्न तसेच पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांतील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेणे, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांशी थेट संवाद साधणे आणि आगामी काळातील पक्षाची दिशा व रणनीती निश्चित करणे, या दृष्टीने राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी माहिती मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT