ठाणे : मनसे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेला प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती डोंबिवली येथील हेदुटने गावात 21 व्या रतन बुवा स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज जिंकलेल्या क्रिकेटपटूशी राज यांनी संवाद साधला असता त्याला बक्षीस म्हणून आतापर्यंत 5 कार त्याने जिंकल्या आहेत. हे राज यांना समजताच त्यांनी... 'क्रिकेट शिकायला हवं होतं...." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यातून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.