15 डब्यांच्या लोकलसाठी रेल्वेस्थानकांचे विस्तारीकरण pudhari photo
ठाणे

Railway station expansion : 15 डब्यांच्या लोकलसाठी रेल्वेस्थानकांचे विस्तारीकरण

ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर 4 ची लांबी वाढविली; 36 किलोमीटर चौथी लाईन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे ः मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतूक सेवेवर दिवसोंदिवस प्रवाशांची गर्दी वाढते आहे. या गर्दीचा ताण सुसह्य करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील 34 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर लवकरच 15 डब्यांच्या लोकल धावून प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

सध्या मध्य रेल्वेवर 12 डब्यांच्या गाड्या आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी अनेक प्रवाशांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक होते. मध्य रेल्वेच्या ताफ्यात 15 डब्यांच्या गाड्या ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक 7 आणि कल्याण येथील मालगाडी यार्डचा वापर केला जातो.

जागेच्या मर्यादेमुळे 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले होते. सध्या 15 डब्यांच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान धावतात, मात्र मार्गावरील अनेक स्थानकांचे फलाट केवळ 12 डब्यांच्या गाड्यांसाठी अनुकूल आहेत.

ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने 34 फलाटांच्या विस्तारीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत कोपर, शहाड, मुंब्रा, कळवा, ठाकुर्ली, आंबिवली, टिटवाळा, वासिंद, आसनगाव, आटगाव, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी, कर्जत, खोपोली आणि पळसदरी या स्थानकांचा समावेश आहे.

या सर्व स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवल्यामुळे आणि 15 डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढणे-उतरणे सोपे होणार आहे तसेच मध्य रेल्वेलाही गर्दीचे व्यवस्थापन करणे सोयीचे होणार आहे.

ई-लोकलवर मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या गाड्यांमुळे एकाच वेळी अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, परिणामी गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. नवीन उपमार्गिकेमुळे तांत्रिक अडचणी कमी होऊन गाड्या वेळेवर धावण्यास मदत होईल.

मुंबई उपनगरीय रेल्वे विस्तार प्रकल्प

  • कल्याण - आसनगाव चौथी मार्गिका: 32 किमी लांबीच्या या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे लोकलची संख्या वाढवता येणार आहे.

  • ठाणे आणि डोंबिवली स्टेशन: स्थानकांवर 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर

  • ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 1, 2 आणि 3 तर, डोंबिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 1, 1 आणि 2 या स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT