Rahul Gandhi RSS Defamation Pudhari
ठाणे

Rahul Gandhi RSS Defamation: आरएसएस मानहानी : राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर होणार

2014 च्या वक्तव्यावरून दाखल खटल्याची सुनावणी; नव्या जामीनदारासाठी न्यायालयात उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : आरएसएस संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी शनिवार (21) रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत.

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे आरएसएस या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात आरएसएस संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आरएसएस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल भा.दं.सं.कलम 500 प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जमीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात

नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे. या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपणी झालेली आहे. तर या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस अधिकारी सायकर यांची सर तपासणी नोंदविलेली आहे, असे शेवटी अँड.नारायण अय्यर यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस मुक्त भारत असा दावा करणाऱ्या भाजपासोबत युती करत भाजपची मातृसंस्था असणाऱ्या आरएसएसने राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असताना त्याच पक्षासोबत युती करून भिवंडीत येत असलेल्या राहुल गांधी यांना धक्कादायक राजकीय भेट देण्याची किमया भिवंडी काँग्रेस करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT