ठाणे : ड्रग्ज प्रकरणात शिंदे कुटुंबाचा काय संबंध? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी ज्या हॉटेलवर आरोप होतोय ते हॉटेल सहा महिन्यांपूर्वी संदीप शिंदे यांना विकले आहे. त्यामुळे आमचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध काय, असा सवाल प्रकाश शिंदे यांनी केला आहे.
सातारा जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणावरून शिंदे कुटुंबाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणार्यांना प्रकाश शिंदे यांनी बुधवारी उत्तर दिले. जे हॉटेलच आमच्या मालकीचे नाही,?त्या हॉटेलमध्ये कुणी राहिला, याचा संबंध आमच्याशी कसा जोडता, असा प्रतिसवाल एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी विचारला आहे. आमची नाहक बदनामी कुणी करेल, तर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नसताना तो जोडणे हे नैतिकतेला धरून नाही, असेही ते म्हणाले.